तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवा 20% दरमहा.
आर्थिक स्थैर्य आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी नियमित बचत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दर महिन्याला उत्पन्नाच्या किमान 20% रक्कम बाजूला ठेवणे ही एक उत्कृष्ट सवय बनवता येईल. खाली दिलेल्या टिप्स तुम्हाला यासाठी मदत करतील:
1. बजेट तयार करा.
दर महिन्याचा खर्च व्यवस्थापित करण्यासाठी बजेट तयार करा.
तुमचे उत्पन्न, आवश्यक खर्च (घरभाडे, अन्न, प्रवास), आणि ऐच्छिक खर्च (मनोरंजन, खरेदी) याचा अंदाज घ्या.
बचतीसाठी आधीच 20% रक्कम बाजूला ठेवा आणि उरलेल्या रक्कमेतून खर्च करा.
2. आवश्यक आणि ऐच्छिक खर्च ओळखा.
आवश्यक खर्च: गरजेच्या गोष्टींवर पैसे खर्च करा. जसे की अन्न, वस्त्र, निवारा, मुलांचे शिक्षण, विमा (टर्म, अपघाती आणि आरोग्य विमा)
ऐच्छिक खर्च: अनावश्यक गोष्टींवर नियंत्रण ठेवा, जसे महागड्या वस्तू किंवा वारंवार बाहेर जेवणे.
3. स्वतःसाठी बचतीचे उद्दिष्ट ठेवा.
तुमच्या रिटायरमेंटसाठी पुरेसे पैसे बाजूला ठेवत आहात का?
मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवत आहात का?
तुम्हाला 5 वर्षांत घर घ्यायचे आहे का?
प्रवास करायचा आहे का?
उद्दिष्ट निश्चित केल्याने बचत करायला प्रेरणा मिळते.
4. स्वतःला ‘पे’ करा.
दर महिन्याच्या सुरुवातीलाच 20% रक्कम वरील उद्देशांसाठी बाजूला ठेवून दरमहा गुंतवत रहा. आणि खंड पडू देऊ नका आणि उद्देश साध्य होई पर्यंत गुंतवणूक मोडू नका.
5. गुंतवणूक करा.
बचत केलेली रक्कम फक्त खात्यात न ठेवता गुंतवा.
म्युच्युअल फंड, एसआयपी, किंवा आर्थिक दृष्ट्या सक्षम अश्या कंपनी शोधा व त्यामध्ये गुंतवा.
तुम्हाला मिळणारा परतावा बचतीला बळकट करतो.
6. अनावश्यक कर्ज टाळा.
क्रेडिट कार्डवर उधळपट्टी टाळा.
जेवढे पैसे परवडतील तेवढ्याच वस्तू खरेदी करा.
7. तुमच्या जीवनशैलीत थोडे बदल करा.
बाहेर खाण्याऐवजी घरगुती स्वयंपाक करा.
वाहतूक खर्च कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहने वापरा.
सध्याची प्रकर्षाने जाणवत असलेली गोष्ट म्हणजे OTT CHANNEL चे सबस्क्रिप्शन, इंटरनेटसाठी तसेच ओला, उबर आणि zomato मुळे होत असलेला वायफळ खर्च टाळा.
8. आपत्कालीन फंड तयार ठेवा.
किमान 6 महिन्यांच्या खर्चाइतका आपत्कालीन फंड बाजूला ठेवा. हा फंड अचानक उद्भवलेल्या गरजांसाठी उपयुक्त ठरतो.
9. प्रगती तपासा.
दर महिन्याला तुमच्या बचतीचा आढावा घ्या. उद्दिष्टे गाठण्यासाठी काही बदल करणे आवश्यक असल्यास तशी कृती करा.
निष्कर्ष :-
दर महिन्याला 20% रक्कम वाचवण्याची सवय सुरुवातीला कठीण वाटू शकते, पण सतत प्रयत्न केल्यास ती शक्य होते. ही बचत तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि भविष्यासाठी आत्मविश्वास मिळवून देईल.
आजच सुरुवात करा, छोटी बचत भविष्यात मोठे फळ देऊ शकते!
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
Prepared by:
Mr. Atul Kulkarni
CERTIFIED FINANCIAL PLANNER®️ | MBA Finance
Contact: 9967447032