आज समजून घेऊयात की नक्की हे SWP प्रकरण काय असते…

SWP म्हणजे काय?
अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर:

जसे तुम्ही गृहकर्ज घेतल्यावर नियमितपणे EMI भरता, तसेच SWP मध्ये तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीला Loan देता.

त्याबदल्यात कंपनी तुम्हाला दर महिन्याला परतावा (EMI सारखा) देते.

 

SWP कोणासाठी फायद्याची आहे?

1. रिटायर झालेले लोक: ज्यांच्याकडे आज एकत्रित रक्कम आहे आणि त्यांना नियमित उत्पन्न हवे आहे.

2. जास्त रिस्क नको असलेले गुंतवणूकदार: ज्यांना सुरक्षिततेसोबत दरमहा निश्चित रक्कम हवी आहे.

3. गुंतवणूक वाढवण्यासाठी योजना: काही लोक SWP च्या परताव्याचा उपयोग SIP सुरू करण्यासाठी करतात.

पुढील १० वर्षांत निवृत्त होणार्‍या लोकांसाठी हा पर्याय योग्य ठरतो.

 

SWP चे फायदे

१. Income ची Flexibility

SWP मध्ये ६% ते ८% पर्यंत मासिक रक्कम काढता येते.

आवश्यकता असल्यास जादा रक्कम काढण्यासाठी योजना बनवता येते.

२. Tax Efficiency

तुम्ही दर महिन्याला काढलेली रक्कम गुंतवणुकीतून आवश्यक युनिट्स विकून दिली जाते.

गुंतवणुकीच्या मुद्दलावर टॅक्स लागत नाही.

नफा ₹1,00,000 च्या वर गेला, तर फक्त १०% लाँग-टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो.

३. Capital Appreciation

पारंपरिक योजनांमध्ये मुद्दल वाढत नाही, पण SWP मध्ये गुंतवणूक हळूहळू वाढते.

काही वर्षांत मासिक उत्पन्नासोबतच मुद्दलवर चांगला परतावा मिळतो.

४. Increasing SWP

तुमची गुंतवणूक जसजशी वाढते, तशी महागाईनुसार मासिक काढणीची रक्कम वाढवता येते.

५. Partial Withdrawal Allowed

गुंतवणूक तुमची असल्यामुळे गरजेनुसार थोडी किंवा पूर्ण रक्कम काढता येते.

६. No TDS Deduction

काढलेल्या रकमेवर TDS कपात होत नाही.

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा:

Prepared by:
Mr. Atul Kulkarni
CERTIFIED FINANCIAL PLANNER®️ | MBA Finance
Contact: 9967447032

YouTube
LinkedIn
LinkedIn
Share
WhatsApp